शपथा कसल्या घेताय, मार्ग सांगा : उद्धव ठाकरे

शपथा कसल्या घेताय, मार्ग सांगा : उद्धव ठाकरे

Published on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शपथा जरूर घ्या. पण, त्यासाठी तुमच्याकडे काय मार्ग आहे, ते सांगा. शपथ घेऊन वेळ काढणे हा मार्ग नाही. मनोज जरांगे-पाटील यांनी 40 दिवस दिले होते. त्यावेळी शपथेला जागून समाजाला न्याय्य हक्क द्यायला हवे होते. त्या शपथेला तुम्ही जागला नाहीत, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. त्यांचे स्वागत आहे, त्यांनी आता जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती आहे, असेही ठाकरे म्हणाले. दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी शपथ घेतली होती. त्यावर ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी माध्यमांशी बोलताना भाष्य केले. ते म्हणाले, शपथ घेणे हा भावनिक प्रकार झाला. शपथ घेऊन वेळ काढणे हा मार्ग नाही. आरक्षणाचा मार्ग आहे तर काढत का नाही?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news