संजय राऊत यांना 4 नोव्हेंबरला हजर राहण्याचे मालेगाव न्यायालयाचे आदेश | पुढारी

संजय राऊत यांना 4 नोव्हेंबरला हजर राहण्याचे मालेगाव न्यायालयाचे आदेश

मालेगाव मध्य : पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याची सोमवारी (दि. २३) मालेगाव न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आला होता. दरम्यान राऊत हे न्यायालयात हजर झाले नसले, तरी ४ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी ४ नोव्हेंबरला होणार आहे.

गिसाका साखर कारखान्याच्या प्रश्नी राऊत यांनी पालकमंत्री भुसे यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. याविरोधात भुसे यांनी न्यायालयात राऊत यांच्या विरोधात मानहानी खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी सोमवारी झाली.. यावेळी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने राऊत यांना दिले होते. त्यामुळे सोमवारी राऊत मालेगावला येणार का? याविषयी तर्क वितर्क लढवले जात होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

Back to top button