एनसीबीच्या ऑपरेशन विभागाने नोंदविला प्रभाकर साईल याचा जबाब | पुढारी

एनसीबीच्या ऑपरेशन विभागाने नोंदविला प्रभाकर साईल याचा जबाब

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईसह बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडून 25 लाखांची खंडणी वसूलीचा गंभीर आरोप करणार्‍या पंच प्रभाकर साईल याचा एनसीबीच्या ऑपरेशन विभागाने गुरुवारी जबाब नोंदविला. गेले दोन दिवस सलग एनसीबीच्या दिल्लीतील विशेष पथकाने साईल याच्याकडे कसून चौकशी करत त्याचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर आता ऑपरेशन विभागाकडून साईलची चौकशी सुरु आहे.

एनसीबी मुंबईने दाखल केलेले गुन्हे आणि केलेल्या कारवाईवर वेगवेगळ्या व्यक्ती आणि स्तरांतून आरोप केले गेले आहेत. या आरोपांचा पाच सदस्यीय पथकाकडून तपास सुरु असून विशेष पथकाने सहा गुन्हे तपासासाठी देण्यात आले आहेत. त्यानुसार एनसीबीच्या या पथकांकडून वेगवेगळ्या प्रकारे तपास सुरु करण्यात आला आहे. एनसीबीने आतापर्यंत त्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह अरबाज मर्चंट, अर्चित कुमार, करन सजनानी, पंच प्रभाकर साईल यांचे जबाब नोंदविले आहेत.

Back to top button