Khichdi Scam Case: कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी | पुढारी

Khichdi Scam Case: कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी

अवधूत खराडे

मुंबई : कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई महानगर महापालिका उपायुक्त संगीता हसनाळे यांच्यासह शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि पाच खासगी कंत्राटदारांच्या घर, कार्यालयांवर छापेमारी सुरु केली आहे. कोरोना महामारीच्या काळात पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने वाढीव दराने बिले सादर करून कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. Khichdi Scam Case

कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. ५२ कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार प्राथमिक तपास करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे. Khichdi Scam Case

खिचडी घोटाळाप्रकरणात आर्थिक गुन्हेशाखेने मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर, ठाकरे सेनेचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर, ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची चाैकशी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button