Ashish Shelar : बाळासाहेबांनी फटकारलेल्या समाजवाद्यांसोबत उद्धव ठाकरेंनी युती केली : आशिष शेलार | पुढारी

Ashish Shelar : बाळासाहेबांनी फटकारलेल्या समाजवाद्यांसोबत उद्धव ठाकरेंनी युती केली : आशिष शेलार

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षासोबत युती करण्याची घोषणा रविवारी केली. त्यानंतर ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते मुंबईत आज (दि.१६) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Ashish Shelar)

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फटकारे मारलेल्या समाजवाद्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी युती करून दाखवली आहे. याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतही युती करून दाखवली आहे. सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासोबत बाळासाहेबांचा त्यांनी फोटो लावला. ठाकरे यांनी राम मंदिरावरही टीका करून दाखवली. महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाकरे यांनी हिंदूंच्या सणावर बंदी आणली होती, अशी टीकाही शेलार यांनी करून ठाकरे यांच्या सरकारवरील टीकेला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. (Ashish Shelar)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज्यातील यापुढील सर्व निवडणुका महायुतीतून एकत्रितपणे लढवणार आहे. मुंबईकर जनता आम्हाला यापुढच्या निवडणुकीत साथ देणार असल्याचा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button