NCP crisis : शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी | पुढारी

NCP crisis : शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सोमवारी सकाळी अकरा वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पक्षावर ताबा कोणाचा आणि चिन्हाचे खरे दावेदार कोण, हे विषय सध्या ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या या याचिकेत अजित पवार गटाचे ४१ आमदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या : 

 

Back to top button