Mumbai Toll: मुंबईत ये-जा करणे महागले; रविवारपासून टोल दरात वाढ | पुढारी

Mumbai Toll: मुंबईत ये-जा करणे महागले; रविवारपासून टोल दरात वाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील वेशीवर असलेल्या टोल दरात रविवारी 1 ऑक्टोबरपासून 5 ते 20 रुपयापर्यंत वाढ (Mumbai Toll)  होणार आहे. त्यामुळे मुंबईत ये-जा करणे चारचाकी खासगी वाहनांसह टॅक्सी व मालवाहतूक वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबई शहरात प्रवेश करण्यासाठी वाशी, मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड एलबीएस मार्ग, ऐरोली व दहिसर असे पाच टोलनाके आहेत. या टोलनाक्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या वाहनांकडून आता वाढीव टोला करण्यात येणार आहे. रविवार 1 ऑक्टोबरला याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर 2002 पासून टोल वसुली सुरू असून तो 25 वर्ष सुरू राहणार आहे. म्हणजेच 2027 पर्यंत वाहन चालकांना टोल भरावा लागणार  Mumbai Toll) आहे.

2002 मध्ये कारसाठी 20 रुपये, मिनीबस 25 रुपये, ट्रक व बस 45, अवजड वाहनांसाठी 55 रुपये टोल होता. 1 ऑक्टोबर 2020 पासून चारचाकी वाहनासाठी 40 रुपये, मिनी बससाठी 65 रुपये, ट्रकसाठी 130 रुपये व अवजड वाहनासाठी 160 रुपये पथकर द्यावा लागत होता. आता सातवी दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 2026 पर्यंत चारचाकी वाहनांसाठी 45 रुपये, मिनी बस 75 रुपये, ट्रक 150 रुपये व अवजड वाहन 190 रुपये टोल भरावा लागणार आहे.

 (Mumbai Toll)  असा वाढणार टोल

सध्याचा टोल                 वाढीव टोल

चारचाकी                             40                               45
मिनी बस                             65                               l75
ट्रक                                   130                             150
अवजड वाहन                     160                              190

हेही वाचा 

Back to top button