Sanjay Raut on Rahul Narwekar | महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राऊतांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा | पुढारी

Sanjay Raut on Rahul Narwekar | महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राऊतांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. गेल्या एक वर्षापासून संविधानाच्या विरोधात सरकार चालवले जात आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत हे आज (दि.२९) माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut on Rahul Narwekar)

उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले,आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर लोकशाही बळकट करण्यासाठी ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली ‘घाना’ला जाणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. पण राज्यातील लोकशाहीची स्थिती काय आहे? असा प्रश्न देखील राऊत यांनी केला आहे. तसेच १ वर्षापासून राज्यात संविधान, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात सरकार चालवत आहेत, असा आरोपही राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. (Sanjay Raut on Rahul Narwekar)

Sanjay Raut on Rahul Narwekar : शिंदे गट पुढील निवडणुका जिंकणार नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार पुढील निवडणुका जिंकणार नाहीत, असा दावा शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. राज्यातील काही भागातील शेतकरी अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान होत असताना मुख्यमंत्री शिंदे परदेश दौऱ्यावर जाण्यास उत्सुक आहेत. महिला आरक्षण विधेयकावर मतदानापासून दूर राहिल्याबद्दल शिंदे शिवसेनेच्या (युबीटी) चार खासदारांविरोधात व्हीप जारी करू शकतात, पण ही आमच्यासाठी किरकोळ बाब आहे, असे राऊत यांनी संसदेत सांगितले. पण यापैकी कोणीही पुढची निवडणूक जिंकणार नाहीत, हे त्यांना (शिंदे गटाच्या आमदारांना) कळायला हवे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा:

 

Back to top button