कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेच असतील : मंत्री चव्हाण | पुढारी

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेच असतील : मंत्री चव्हाण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कल्याण लोकसभा मतदारसंघावर यावेळी भाजप दावा करणार, अशी चर्चा असताना भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे पुढचे खासदार हे श्रीकांत शिंदे हेच असतील, असे स्पष्ट केले आहे.

मनसेनेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपी उमेदवाराच्या दिशेने चालली आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्य मंत्री चव्हाण यांनी खोडून काढले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 45 पेक्षा जास्त खासदार कसे निवडून आणता येतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कुठेतरी विरजण घालण्याचे काम काहीजण करत आहेत, असे ते म्हणाले.

Back to top button