Rainfall Updates: राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता | पुढारी

Rainfall Updates: राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी गडगडाटांसह पावसाची अधिक शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुथ डॉ.के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे. (Rainfall Updates)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे. रविवार २४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील तुरळक भागात ढगांच्या गडगडाटांसह पावसाची दाट शक्यता आहे. तसेच राज्यातील कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हयांमध्ये पुढील ४ दिवस पावसाने पाठ फिरवली असल्याचे देखील हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशांमध्ये दर्शवण्यात आले आहे.  (Rainfall Updates)

Rainfall Updates:  …असे आहेत अलर्ट

विदर्भ : 21 ते 23 मुसळधार
मराठवाडा : 21 ते 23 मुसळधार
मध्य महाराष्ट्र : 22 व 23 मुसळधार (घाटमाथा)
कोकण : 21 व 22 मुसळधार

हेही वाचा:

Back to top button