मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील मढ कोळीवाड्याच्या पश्चिम समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे. बोटीतील सात जणांना वाचवण्यात यश आले असून अद्याप बचावकार्य सुरू आहे.
पश्चिम मालाडच्या मढ कोळीवाड्यातील आकाश भालचंद्र कोळी हे लक्ष्मीनारायन (IND-MH 2-MM 6223) ही बोट घेवून मुहूर्ताला मासेमारी करण्यासाठी साकाळी साडेदहा वाजता गेले होते. मढ कोळीवाड्याच्या पश्चिम समुद्रात २ किलोमीटर अंतरावर असलेल्या काश्या खडकावर बोट जोरदात आदळली. यामुळे नौकेला खालच्या बाजूने मोठे भगदाड पडून, नौकेत पाणी शिरले व नौका बुडाली. याबाबतची माहिती मिळताच गावातील तीन ते चार नौका वाचविण्यासाठी गेल्या आहेत. बचावकार्य सुरु असून मढ गावातील ग्रामस्थ व तरुण बचाव कार्यासाठी धावत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी जेट्टीवर मोठी गर्दी केली आहे.
हेही वाचा :