Nilofar malik : 'मुलांनी मित्र गमावले, ड्रग्ज विक्रेत्याची बायको म्हणून हिणवले गेले' | पुढारी

Nilofar malik : 'मुलांनी मित्र गमावले, ड्रग्ज विक्रेत्याची बायको म्हणून हिणवले गेले'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज एक नवीन खुलासा होत आहे. मुंबई एनसीबी झोनचे संचालक समीर वानखेडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर चांगलेच अडचणीत आले आहेत. खंडणीचे आरोप आणि त्यानंतर जात प्रमाणपत्रावरून समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान तपास काढून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर ५ प्रकरणांचा तपासातूनही त्यांची गच्छंती करण्यात आली आहे.

नवाब मलिकांकडून आरोपांची मालिका सुरुच असताना आता त्यांची निलोफर मलिकने (Nilofar malik) पत्र लिहून नवऱ्याच्या अटकेनंतर मानसिक त्रास झाल्याचे म्हटले आहे. पती समीर खानच्या अटकेनंतर मुलांनी मित्र गमावले, ड्रग्ज विक्रेत्याची बायको म्हणून हिणवले गेले असे निलोफरने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खानने (Nilofar malik) पत्र ट्विट केले आहे. पती समीर खान याला एनसीबीने जानेवारीमध्ये अटक केल्यानंतर तिच्या कुटुंबाला दिलेली वागणूक आठवत ती “अन्याय आणि बेकायदेशीर” असल्याचे वर्णन निलोफरने पत्रात केली आहे.

१३ जानेवारी रोजी एनसीबीने समीर खानला अटक केली होती. एनसीबीने दावा केला की, समीर खानने १९४.६ किलो गांजा विकत खरेदी विक्रीचा कट रचला होता. या प्रकरणी समीर खानसह अन्य ५ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

निलोफरने या पत्राला ‘फ्रॉम द वाइफ ऑफ एन इनोसेंट, द बिगनिंग’ असे शिर्षक दिले आहे. निलोफरने (Nilofar malik) पती समीर खानला एनसीबीकडून अटक केलेल्या रात्रीची आठवण नमूद केली आहे. तिचे कुटुंब अजूनही ज्या ‘आपत्ती’शी झुंजत असल्यचे म्हटले आहे.

आमच्या कुटुंबाला ‘बहिष्कृत’ करण्यात आल्याचा आरोपही निलोफरने केला. आमच्यासाठी ” ड्रग्ज विक्रेत्याची पत्नी” आणि “ड्रग स्मगलर” असे शब्द वापरले गेले. मुलांनी मित्र गमावल्याचेही तिने म्हटले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button