राज्यात ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर होणार? | पुढारी

राज्यात ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर होणार?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काही जिल्ह्याचा अपवाद वगळता राज्यात समाधानकारक पाऊस झाला नसून पुढील दोन आठवड्यात पाऊस पडला नाही तर राज्य सरकार ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने केंद्राकडून जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मदत आणि पुनर्वसन मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना अहवाल देणार आहोत. राज्याचे शेतकर्‍यांना मदत देण्याबाबतच्या धोरणाची माहितीही केंद्र सरकारला देणार असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारचे नैसर्गिक आपत्ती मदत धोरण क्लिष्ट असल्याची तक्रार शेतकरी संघटनांनी यापूर्वीच केली आहे. या तक्रारीची दखल घेत मदतीच्या निकषात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचेही अनिल पाटील यांनी सांगितले.

सरकारच्या हवामान खात्याने दिलेला हा पर्जन्यमानाचा नकाशा आहे. या नकाशावर लाल रंगात दर्शविलेल्या जिल्ह्यांची वेगाने गंभीर दुष्काळाकडे वाटचाल सुरु आहे. हिरव्या रंगात दर्शविलेले देखील गंभीर दुष्काळात आले आहेत कारण पावसाचा खंड समाविष्ट करून वस्तुस्थिती दर्शविली तर तिथे देखील परिस्थिती गंभीर आहे.

तरीही वेळेवर दुष्काळ घोषित होणार नाही. कारकून म्हणतील म्हणतील उपग्रहाचा डाटा अजून मिळाला नाही, केंद्राचे पथक येवू द्या, असे महिन्यावर महिने जातील, अशी तीव्र प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने राजन क्षीरसागर यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button