Dhule bribe case: ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरोग्य अधिकाऱ्याला अटक | पुढारी

Dhule bribe case: ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरोग्य अधिकाऱ्याला अटक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेच्या मोबदल्यासाठी या आरोग्य अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार आली होती. (Dhule bribe case)

चाळीसगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार युवकांनी या संदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला गेला. (Dhule bribe case)

तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरीता तक्रारदाराने तत्कालीन आरोग्य अधिकारी देवराम लांडे यांच्या समवेत संपर्क केला. मात्र, लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने थेट धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून तक्रार केली. त्यानुसार पथकाने डॉ. लांडे यांच्या विरोधात चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा 

Back to top button