Maratha Reservation Protest Jalna : आज उद्धव ठाकरे जालन्याला जाणार | पुढारी

Maratha Reservation Protest Jalna : आज उद्धव ठाकरे जालन्याला जाणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता जालन्याला जाणार असून ते अंतरवाली सराटी येथे भेट देणार आहेत. (Maratha Reservation Protest Jalna) वांद्रे, मुंबई येथील रंगशारदा सभागृहात ठाकरे बोलत होते. त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवर जालेल्या लाठीचार्जचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही निशाणा साधला. (Maratha Reservation Protest Jalna)

ठाकरे यांनी वन नेशन वन इलेक्शनवरून सरकारवर हल्लाबोल केला. जालन्यातील लाठीचार्ज मागे सरकारच आहे. मोदी सरकार हिंदू द्वेष्टा सरकार आहे. गणपतीच्या दिवसांत विशेष अधिवेशन कसं लावलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लाठीचार्जमागे सरकारने आदेश दिले. सरकार तुमच्या दारी, पोलिस तुमच्या घरी अशी राज्याची अवस्था आहे, असे घणाघात आरोप ठाकरे यांनी केला. ठाकरे म्हणाले, घराणेशाही हेचं आमचं हिंदुत्व आहे. ‘इंडिया”मुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या लाठीचार्जशिवाय लाठीचार्ज होत नाही. राज्यात शासकीय अत्याचार सुरु आहे.

राज्यात एक फूल, दोन हाफ सरकार अशी टीका ठाकरेंनी केली. हुकूमशाही चिरडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करून दाखवली. आंदोलकांकडे सरकारचं लक्ष नाहीये. महाराष्ट्रातही खोक्यातून जन्माला आलेलं सरकार आहे. कर्नाटकात भ्रष्टाचारामुळे भाजपचा पराभव झालाय. सरकारची प्रधानमंत्री आवास योजना नव्हे तर आभास योजना अशी खरमरीच टीका ठाकरेंनी सरकारवर केली.

Back to top button