मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; एसटीची ५ जिल्‍ह्यातील वाहतूक बंद | पुढारी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; एसटीची ५ जिल्‍ह्यातील वाहतूक बंद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षण आंदोलनाला जालना जिल्ह्यात लागलेल्या हिंसक वळणामुळे राज्यातील एसटीच्या वाहतुकीला फटका बसला आहेत. शुक्रवारपासून एसटीच्या 17 बसची जाळपोळ केली आहे. जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील एसटीची वाहतूक बंद करण्याचे पोलिसांनी आदेश आणि सूचना केल्याने या जिल्ह्यात जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जालना शहरात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी राज्यभरात उमटत आहेत. शनिवारी मराठा आंदोलकांनी अनेक शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आतापर्यंत एसटीच्या 17 बसेस जाळल्या आहेत. औरंगाबादमध्येही आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध केला आहे. त्यामुळे पोलिसांनी एसटी महामंडळाला जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यातील एसटीची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई पुण्याहून या जिल्ह्यात जाणाऱ्या एसटीची वाहतूक थांबविण्यात आली आहे. यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button