तुमचा कुटुंब वाचवण्याचा तर मोदीजींचा देश वाचविण्याचा अजेंडा – चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

तुमचा कुटुंब वाचवण्याचा तर मोदीजींचा देश वाचविण्याचा अजेंडा - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – तुमचा कुटुंब वाचवण्याचा तर मोदीजींचा देश वाचविण्याचा अजेंडा आहे. मुंबईत होणारी ही इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर सोडले आहे. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, करोना काळात कोट्यवधींची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.

महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव ‘ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदीजींचे देशसेवेचं कार्य अखंड सुरू राहणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Back to top button