

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – इंडिया नावाच्या शब्दाला टिंब लावणे योग्य नाही, अनेक पक्षाकडे एकमत नाही. हा प्रयोग नवीन नाही, यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. देशात दिसलं पाहिजे म्हणून या बैठका घेत आहेत. मुळात त्यांच्या मागे जनता नाही, कमळाचे उमेदवार निवडून येणार आहेत असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
आमच्या सरकारमध्ये योग्य समन्वय असून तिन्ही नेत्यांना एकमेकांचे निर्णय माहित असले पाहिजे, निर्णय घेताना कळले पाहिजे, एखादा निर्णय होताना, चार लोकांनी घेतलेले निर्णय अधिक प्रभावी असेल, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा महत्वाचा निर्णय असून त्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यामुळे एखाद्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयात दुसरा नेता आणखी एडिशन करून त्याची निर्णयाची ताकदच वाढवेल, असे अजितदादा पवार यांच्या संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
NDA ची बैठक झाली आहे आणि आम्ही तिन्ही पक्षातील नेत्यांकडे किती जागा आहेत, या संदर्भात विभागानुसार बैठक घेणार आहे. आमच्या बैठकीत नवीन काही नाही यापूर्वीही आमच्या बैठका झालेल्या आहेत.
विरोधकांना भविष्यात विरोधी पक्ष नेता बनवता येईल एवढ्या सुद्धा जागा मिळणार नाहीत. काँग्रेसला विरोधीपक्ष नेताही बनवता येणार नाही. इंडिया आघाडीचे कुणीही संयोजक झाले तरी काहीही होणार नाही. हे नेते देशव्यापी काहीच करू शकणार नाही. देशाला उंची देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. किंचित सेना शिल्लक आहे. सेना तीन साडेतीन जिल्ह्यात प्रभाव असणारे, काही कोकणपुरते मर्यादित आहेत अशीही टीका केली.