इंडिया आघाडीच्या बैठकीआधी प्रमुख नेत्यांचे एकत्रित फोटोसेशन, दिला एकजुटीचा संदेश | पुढारी

इंडिया आघाडीच्या बैठकीआधी प्रमुख नेत्यांचे एकत्रित फोटोसेशन, दिला एकजुटीचा संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षाची भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक २८ पक्षांच्या आघाडीची (इंडिया) मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि.१) औपचारिक बैठक होत आहे. यावेळी प्रमुख विरोधी पक्षांतील ११ सदस्यांची समन्वय समिती जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रमुख नेत्यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे. (INDIA Alliance Meeting Mumbai)

दरम्यान, इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. लोगो हा आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यावर आमच्या बैठकीत चर्चा होणार आहे, पण आज अनावरण होणार नाही, असे ते म्हणाले. (INDIA Alliance Meeting Mumbai)

गुरुवारी, अनौपचारिक बैठकीदरम्यान, विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएशी एकमुखाने सामना करण्याचा निर्धार केला. तसेच भाजपविरोधी प्रचाराला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही प्रमुख नेत्यांनी जागा वाटपाला अंतिम रूप देण्याच्या आणि काही आठवड्यांच्या कालावधीत संयुक्त अजेंडा तयार करण्यावर भर दिला.

हेही वाचा 

Back to top button