राज्यात पाच हजार महाविद्यालये, 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण धोरण : चंद्रकांत पाटील यांची माहिती | पुढारी

राज्यात पाच हजार महाविद्यालये, 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण धोरण : चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2020 मध्ये सुरू केल्यानंतर, तत्कालीन राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याला विरोध दर्शविला. त्यामुळे तीन वर्षे हे धोरण राज्यात राबविता आले नाही. त्यानंतर माझ्याकडे याची जबाबदारी आल्यानंतर, पंधराशे कॉलेजांमध्ये हे धोरण राबविण्यात यशस्वी झालो. पुढच्या वर्षी पाच हजार कॉलेज आणि 42 विद्यापीठांमध्ये हे धोरण राबविण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 33 लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. या वेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, संचालक पूजा मिसाळ, दीपक मिसाळ, ब्रिक्स कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य डॉ. पूर्वा केसकर आदी उपस्थित होते. या वेळी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे आणि शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले. माधुरी मिसाळ यांनी ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची माहिती देत, विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मला शिक्षणमंत्री केले आहे. एक वर्षापूर्वी माझ्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाचा पदभार देण्यात आला. 2014 ते 2019 या काळात महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम अशा आठ खात्यांचा पदभार होता. त्या सर्व विभागांची कामगिरी चांगली राहिली आहे.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री
हेही वाचा

Back to top button