Rainfall Forecast | राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, IMD ची माहिती | पुढारी

Rainfall Forecast | राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाची शक्यता, IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन : राज्यातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, उद्या २७ ऑगस्टपर्यंत दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर केला आहे. तर देशातील उर्वरित राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.

दरम्यान, पुढचे दोन दिवस हवामान विभागाकडून बहुतांश ईशान्यकडील राज्यांना भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज दुपारी हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बुलेटीननुसार, शनिवार (दि.२६) आणि रविवारी (दि.२७) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता (Rainfall Forecast) आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशातील विविध भागात अति मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच गंगेचे खोरे, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा आणि बिहार या राज्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर येथील पाऊस कमी (Rainfall Forecast) होईल.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेशातही आणखी पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Rainfall Forecast) पुढील एक आठवडाभर देशाच्या उर्वरित भागांमध्येही कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button