Vijay Wadettiwar | इस्रो शास्त्रज्ञांच्या भेटीपूर्वीच पीएम मोदींचा रोड शो का?- विजय वडेट्टीवार | पुढारी

Vijay Wadettiwar | इस्रो शास्त्रज्ञांच्या भेटीपूर्वीच पीएम मोदींचा रोड शो का?- विजय वडेट्टीवार

पुढारी ऑनलाईन : इस्रोच्या चांद्रयान-३ च्या लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल ठेवले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीमागे शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इस्रो शास्ज्ञज्ञांच्या भेटीपूर्वी ‘रोड शो’ का?, हे मिशन ज्यांनी यशस्वी केले त्या शास्त्रज्ञांना सोबत घेऊन ‘रोड शो’ का केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेत हा ‘रोड शो’ राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पुढे वडेट्टीवार म्हणाले, इस्रोने केलेल्या कामगिरीचा आम्हालादेखील अभिमान आहे. पंतप्रधान शास्त्रज्ञांना भेटायला गेले होते. त्यांनी पहिल्यांदा शास्त्रज्ञांना भेटायला हवे, पण त्यांनी रोड शो का केला? तो नंतर करता आला असता. ज्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी केली त्यांच्यासोबत हा रोड शो केला असता तर ही देशासाठी आणखी अभिमानाची गोष्ट ठरली असती, असे देखील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button