NCP Jitendra Awhad : “…गद्दारों का राज बदल देंगे” कोल्हापूरच्या सभेनंतर आव्हाडांचे ट्विट चर्चेत | पुढारी

NCP Jitendra Awhad : "...गद्दारों का राज बदल देंगे" कोल्हापूरच्या सभेनंतर आव्हाडांचे ट्विट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “कळत नकळत एक प्रेमाचं वादळ निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील तरुणाईने निर्णय घेतला आहे की, आमचा आजोबा आमच्यासाठी लढतोय. राज्य आणि राष्ट्र वाचविण्यासाठी लढतोय. कुठलाही प्रस्थापित नेता कोल्हापूरमध्ये नसताना एवढी गर्दी हा थेट ईशारा आहे. ‘तख्त बदल देंगे, ताज बदल देंगे…गद्दारों का राज बदल देंगे'” असं ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. (NCP Jitendra Awhad)

NCP Jitendra Awhad :  ‘तुमचं वय झालं आहे तुम्ही घरी बसा…’

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शुक्रवारी (दि.२५) कोल्हापूरमध्ये निर्धार सभा झाली. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की,

“येवला, बीड, कोल्हापूर या तिनही सभांचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे. लोकांना सगळ्यात जास्त काय भावलं असेल; तर एक 83 वर्षांचा योद्धा शिव, फुले, शाहू, आंबेडकरांची वैचारिक लढाई लढण्यासाठी म्हणजेच संविधानातील धर्मनिरपेक्ष हा शब्द वाचविण्यासाठी मैदानात उतरला आहे. ही तरुणाई जात, पात, धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करते. आजची कोल्हापूरची सभा देखील याच तरुणांनी गाजवली. तरुणाईला लागलेलं वेड पाहता पुढच्या काळामध्ये आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच वादळ महाराष्ट्रात निर्माण होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही.

या तरुणांमध्ये ‘तुमचं वय झालं आहे तुम्ही घरी बसा’ या वाक्याबद्दल प्रचंड तिरस्कार आणि राग या दिसतोय. तुम्ही असं कोणाला कसे काय बोलू शकता? असं माझ्याशी स्वतः बोलताना त्यांनी भावना व्यक्त करून दाखवल्या. शेवटी त्यांचा अनुभव, त्यांच वय आणि त्यांची व्यापकता याचा सन्मान करायलाच पाहिजे होता. त्यांच्या वयाचा झालेला अपमान हा प्रत्येकाच्या घरात झालेला अपमान आहे. कारण आजोबा तर प्रत्येकाच्याच घरात असतात. कळत नकळत एक प्रेमाचं वादळ निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील तरुणाईने निर्णय घेतला आहे की, आमचा आजोबा आमच्यासाठी लढतोय. राज्य आणि राष्ट्र वाचविण्यासाठी लढतोय. कुठलाही प्रस्थापित नेता कोल्हापूरमध्ये नसताना एवढी गर्दी हा थेट ईशारा आहे. ‘तख्त बदल देंगे, ताज बदल देंगे…गद्दारों का राज बदल देंगे’

हेही वाचा 

Back to top button