Bandra station | धक्कादायक! हिंदू मुलीसोबत दिसताच मुस्लिम युवकाला जमावाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरला

Bandra station
Bandra station
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मुंबईतील वांद्रे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक मुस्लिम युवक एका हिंदू मुलीसोबत प्रवास करत होता. दरम्यान, अज्ञात जमावाने 'जय श्री राम' म्हणत सदर युवकाला मारहाण केली. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची चौकशी करत, कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

स्वातंत्र्य दिनादिवशी मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर मुस्लिम युवक मौजमस्ती करताना दिसला. या कारणावरून जमावाने मुस्लिम तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, व्हायरल व्हिडिओत लाल रंगाचा शर्ट घातलेल्या युवकाच्या जमावाकडून त्याला बेदम मारहाण केले जात असल्याचे दिसून आले आहे. हा मुस्लिम युवक या संतप्त जमावाला विरोध करण्याचा प्रयत्न करतो. तसेच या मुलासोबत असणारी मुलगी "त्याला मारू नका" अशी विनंती जमावाला करताना दिसत आहे.

या प्रकरणातील गुंडांना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी-वारिस पठाण

यावर घटनेसंदर्भात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण म्हणाले, वांद्रे स्टेशनवर लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदुत्ववादी गुंडांनी एका नि:शस्त्र मुस्लिम मुलाला निर्दयपणे बेदम मारहाण केली. आज आपण स्वातंत्र्याची 77 वर्षे साजरी करत आहोत. मुस्लिमांनाही हा दिवस पहावा लागेल, असे आपल्या हुतात्म्यांनी कधीच वाटले नव्हते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन यात सहभागी असलेल्या सर्व गुंडांना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्यापूर्वी कोणी १०० वेळा विचार करेल असेही पठाण यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. हे  ट्विट त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news