Sanjay Raut : परमबीर सिंग पळून जाण्यामागे केंद्राचे पाठबळ | पुढारी

Sanjay Raut : परमबीर सिंग पळून जाण्यामागे केंद्राचे पाठबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे देश सोडून पळून गेलेले नाहीत. त्यांना पळवून लावले आहे. महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला केंद्राचे पाळबळ मिळाल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

देशमुख यांना अटक हे ठरवून चाललेले आहे. अजित पवारांच्या संबंधित लोकांवर धाडी पडल्या. भाजपचे सर्व जंगलात राहतात का?, त्यांची संपत्ती नाही का. महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण बिघडवलं आहे. त्याला भाजप जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपनं सुरु केलेले राजकारण त्यांच्यावरचं उलटेल, असा इशाराही त्यांनी दिला. माझ्या कुटुंबाला, पत्नीला त्रास देण्यात आला. पण किती त्रास झाला तरी तुमचं सरकार येणार नाही, असेही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रोखण्याची न्यायालयीन लढाई हरल्यानंतर देशमुख अखेर सोमवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी वकीलासह ईडी समोर हजर झाले. तब्बल तेरा तास त्यांची चौकशी चालली. मध्यरात्र उलटली, 1 वाजला तरी ईडी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर त्यांची चौकशी सुरूच होती तेव्हाच या अटकेचे संकेत मिळाले होते. ही चौकशी सुरू असतानाच ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार दिल्लीहून तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनीच देशमुख यांच्या अटकेला दुजोरा दिला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : …आणि खुद्द शाहू महाराजांनी दिला भाकड जनावरांना आश्रय | #diwali2021

Back to top button