Tomato prices : एपीएमसीसह किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर कोसळले | पुढारी

Tomato prices : एपीएमसीसह किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर कोसळले

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोने (Tomato prices)  उचल खाली होती. घाऊक बाजारात 110 तर किरकोळ बाजारात 250 रूपये किलो विक्री होणारा टोमॅटोचे दर कोसळले आहेत. इतर राज्यांत होणारी आवक बंद करून शेतक-यांनी आपला माल मुंबई एपीएमसीत पाठवल्याने आवक वाढली. यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटो 80 रूपये म्हणजे किलोमागे 20 रूपये दर कमी झाले. तर किरकोळला मोठा फटका बसला आहे. 200 ते 250 रूपये किलोवरून थेट 140 रूपये किलोवर दर आल्याने किलोमागे 60 ते 110 रूपये दर कमी झाले आहेत. आज (दि.११)  एपीएमसीत 1395 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. राज्यातील माल एपीएमसीत येतो. कुठूनही टोमॅटोची आयात केलेली नाही, अशी माहिती एपीएमसी संचालक आणि घाऊक भाजीपाला व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली.

राज्यात जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोने चांगलाच भाव खाल्ला होता. कधी नव्हे एवढा दर टोमॅटोला पहिल्यांदा मिळाला. टोमॅटोच्या दरात जूनच्या दुस-या आठवड्यापासून वाढ होण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात 16 ते 20 रूपयांवरून टोमॅटो 40 ते 45 रूपये किलो घाऊक बाजारात झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आवक कमी होताच हे दर आणखी वाढून 55 ते 60 रूपये किलोवर पोहचले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 65 ते 75 रूपये तर दुस-या आठवड्यात 85 ते 90 रूपये झाले. शेवटच्या आठवड्यात 95 ते 110 रूपये किलो पर्यंत टोमॅटोने मजल मारली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाच दर 110 ते 120 रूपये किलो होता. याचा परिणाम किरकोळ बाजारात दुस-या दिवशी उमटत होते. घाऊकपेक्षा किरकोळ बाजारातील दर हे नेहमीच दुप्पट दिसून आले. यामुळे टोमॅटो खरेदी करताना गृहिणी, हाॅटेल चालक, हातगाडीवर टोमॅटो भाजी विक्री करणा-यांनी हात आखडता घेतला. (Tomato prices)

एक किलो टोमॅटो खरेदी करणारा ग्राहक पाव किलो वर खरेदीवर आला. केवळ टोमॅटोचे वाढलेला दर हे एकमेव कारण होते. जुलैअखेर  आणि ऑगस्ट 7 तारखेपर्यंत टोमॅटो 200 ते 225 रूपये किलोने किरकोळ बाजारात विक्री होत होती. आज  एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात टोमॅटोचे दर 100 रूपयांवरून 80 रूपये किलो म्हणजे 20 रूपये किलोमागे कमी झाले. याचा परिणाम थेट किरकोळ बाजारात दिसून आला. किरकोळ बाजारात 200 ते 250 रूपये किलो विक्री होणारा टोमॅटो आज टोमॅटोचे दर 140 रूपये किलोपर्यंत आले. म्हणजे किलोमागे 60 ते 110 रूपये रुपयांपर्यंत दर घसरले. टोमॅटोचा दर्जा, आकारानुसार त्याची प्रतवारी निश्चित केली जाते. त्यानुसार दर ठरवले जातात. आज 1395 क्विंटल टोमॅटोची आवकी झाली. आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात ही मोठी घसरण झाली आहे. शिवाय नाशिक, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील टोमॅटोची परराज्यात होणारी आवक बंद झाल्याने तो माल मुंबई एपीएमसी आला. त्याचा हा परिणाम आहे. टोमॅटोची कुठलीही आयात करण्यात आली नाही, अशी माहिती एपीएमसी संचालक आणि घाऊक भाजीपाला व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली.

हेही वाचा 

 

Back to top button