मुंबई : अंधेरी चकाला येथे डोंगराचा भाग खचला | पुढारी

मुंबई : अंधेरी चकाला येथे डोंगराचा भाग खचला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने मुंबई अंधेरी येथील चकाला परिसरात रामबाग एसआरए तळ मजला अधिक सात मजला इमारतीच्या शेजारी असलेल्या डोंगराचा भाग रात्री २ च्या दरम्यान खचून इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर आदळला. त्यात तळ मजला आणि पहिल्या मजल्यावरील घरात डोंगराची माती घुसली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून काही घरांचे नुकसान झाले आहे.

घटना स्थळावर उपस्थित मरोल अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळ मजल्यावरील काही घरे आणि पहिल्या मजल्यावरील काही घरांचे नुकसान झाले आहे. येथील रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि महापालिका पथक असून मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button