Kirit Somaiya Viral Video | किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओची सखोल चौकशी करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

Kirit Somaiya Viral Video | किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओची सखोल चौकशी करणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या आक्षेपार्ह चित्रफीतप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. हा विषय गंभीर असून, मी विरोधकांच्या भावनांशी सहमत आहे. विरोधकांकडे काही तक्रारी असल्यास त्यांचीही चौकशी केली जाईल, प्रकरण दडपले जाणार नाही, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या आक्षेपार्ह क्लिपचा मुद्दा उपस्थित केला. सोमय्या यांच्यासंदर्भातील आठ तासांच्या व्हिडीओ क्लिपचा पेनड्राईव्हच दानवे यांनी उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्याकडे देत कारवाईची मागणी केली. यावेळी विरोधकांनी सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले. (kirit somaiya viral video)

राजकारणात अनेकदा असे प्रसंग येतात, ज्यात माणसाचे संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागते. केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, त्यासंदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील, तर त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या सगळ्याची चौकशी करू. फक्त गृहितकांच्या आधारे चौकशी करता येणार नाही. संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही. त्यामुळे पोलिस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील, असेही फडणवीस म्हणाले. (kirit somaiya viral video)

     हेही वाचा : 

Back to top button