j m abhyankar : अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी ज. मो. अभ्यंकर | पुढारी

j m abhyankar : अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी ज. मो. अभ्यंकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी ज. मु. अभ्यंकर यांची नियुक्ती झाली आहे. अभ्यंकर यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या कामकाजाला आता वेग येण्याची शक्यता आहे. (j m abhyankar)

अभ्यंकर यांनी यापूर्वी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष पद भूषवले आहे. तसेच शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्षही तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कामाचा दांडगा अनुभव पाहता या पदाला न्याय देतील असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

j m abhyankar : पुढील दीड वर्षांसाठी नेमणूक

अभ्यंकर यांची आयोगाच्या अध्यक्षपदी पुढील दीड वर्षाच्या कालावधी करिता नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. तसेच आयोगाच्या सदस्यपदी आर. डी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

किशोर मेढे यांची सामाजिक आणि आर्थिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहेत.

Back to top button