Ajit Pawar Meet Sharad Pawar : शरद पवारांबराेबर नेमकी काय चर्चा झाली? ; प्रफुल्ल पटेल म्‍हणाले… | पुढारी

Ajit Pawar Meet Sharad Pawar : शरद पवारांबराेबर नेमकी काय चर्चा झाली? ; प्रफुल्ल पटेल म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यामुळे शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची वेळ न घेता आज (दि.१६) वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्य़ांनी भेट घेतली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी (Ajit Pawar Meet Sharad Pawar)  बोलताना दिली.

पटेल पुढे म्हणाले की, आम्ही सर्वांनी शरद पवारांना विनंती केली की, राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याचा विचार करावा. सर्वांची इच्छा आहे की, राष्ट्रवादी एकसंध राहावी, मजबुतीने पुढे काम करावे, यापुढे तुम्ही मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. परंतु, पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असेही पटेल यांनी स्‍पष्‍ट केले. (Ajit Pawar Meet Sharad Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे, आदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे ही भेट घेण्यात आली आहे.

Ajit Pawar Meet Sharad Pawar: अधिवेशनाआधी भेट घेतल्याने चर्चांना उधाण

विधीमंडळाचे उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या एक दिवस आधी अजित पवार यांच्यासह गटाने शरद पवार यांची भेट घेत आहेत. देवगिरीच्या बंगल्यावरील बैठकीनंतर पहिल्यांदाच ही भेट घेण्यात येत आहे. यासोबतच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्ष प्रतोद जितेंद्र आव्हाड हे देखील वाय बी सेंटरला दाखल झाले आहेत. मात्र, ही बैठक नेमकी कशासाठी आहे, याविषयी जयंत पाटील यांनी मला काहीही माहित नसल्याचे सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला. जयंत पाटील म्हणाले मला फक्त बैठकीसाठी तातडीने पोहोचण्यासाठी सांगितले. त्यामुळे मला काहीच माहित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button