उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत | पुढारी

उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात त्यांचे आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी तोबा गर्दी केली असून अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असून त्यासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले आहेत. दरम्यान अजित पवार यांना नाशिकमधील राष्ट्रवादीच्या सहाही आमदारांनी पाठिंबा जाहिर केला आहे. सहाही आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार नाशिकमध्ये आले होते. येवल्यात शरद पवार यांची सभा झाली. त्यात शरद पवारांनी बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले.  त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या टिकेला आज अजित पवार नेमंक काय उत्तर देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सध्या ते शासकीय विश्राम गृहाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यानंतर नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी अकरा वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी अजित पवार रवाना होतील.

Back to top button