मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी दिले उत्तर | पुढारी

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी दिले उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर कोणला कोणते खाते मिळणार आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खातेवाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचे उत्तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहे. “खातेवाटपाचा निर्णय आणि मंत्रिमंडळ विस्तार उद्याच (दि.१४) होईल,” असे एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले..

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची गेले वर्षभर चर्चा सुर होती. पण गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर पावसाळी अधिवेशना आधी मंत्रिमंडळी विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. गेले काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात खातेवाटप आणि मंत्रिमंडळावर खलबते सुरू आहे. विस्ताराचा मुहूर्त कधी निघणार याकडे सर्वाचे लक्ष लागले असतानाच आमदार शिरसाट यांनी उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button