क्रूझ पार्टी आयोजक वानखेडेंचा मित्र असल्याने सोडले; नवाब मलिक यांचा आरोप | पुढारी

क्रूझ पार्टी आयोजक वानखेडेंचा मित्र असल्याने सोडले; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई, पुढारी ऑनलाईन

एनसीबीचे झोनल ऑफिसर समीर वानखेडे आणि क्रूझ पार्टी आयोजक काशिफ खान यांची घनिष्ट मैत्री आहे. क्रूझवर १३०० लोक असताना केवळ १३ लोकांची चौकशी केली जाते हा आयोजकांचा खेळ आहे. त्यामुळे काशिफ खानवर कारवाई केली जात नाही, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी केला आहे.

वादग्रस्त क्रूझ पार्टीवर कारवाई करताना तेथील चार हजार जणांपैकी चार ते पाच जणांना अटक केली. ही कारवाई संशयास्पद आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

या पार्टीची आयोजक फॅशन टीव्ही असून फॅशन टीव्हीचे भारतातील प्रमुख काशिफ खान यांनीच ही पार्टी आयोजित केली होती. वानखेडे यांच्या मते जर या पार्टीत ड्रग्ज सापडले तर आयोजक काशिद खान यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल मलिक यांनी केला आहे.

पार्टीत दाढीवाला कोण होता असा सवाल करत मलिक यांनी बुधवारी सस्पेन्स तयार केला होता. त्यानंतर गुरुवारी काशिफचा हा समीर वानखेडे यांचा मित्र असल्याने त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे म्हटले आहे.

काशिफ खानवर कारवाई का केली नाही, याचे उत्तर मला समीर वानखेडे यांच्याकडून हवे आहे. कार्डिलिया क्रूझला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नव्हती. परवानगी नसतानाही क्रूझ कशी सोडली गेली?

क्रूझ पार्टी आयोजक : तपासणी का नाही?

क्रूझवर असलेल्या १३०० लोकांची तपासणी का झाली नाही? तर क्रूझवर रेव्ह पार्टी असेल, कर मग रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सर्व लोकांची तपासणी का केली गेली नाही? असे मलिक म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘हे संपूर्ण प्रकरण आयोजकाशी जोडले गेले असून आयोजक हे समीर वानखेडे यांचे मित्र आहेत. या सर्व गोष्टी जाणूनबूजून केल्या आहेत. केवळ १३ लोकांना लक्ष्य केले गेले. हा संपूर्ण खेळ पार्टीच्या आयोजकाचा आहे. याची चौकशी का केली जात नाही.’

हेही वाचा : 

Back to top button