Home Minister : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह | पुढारी

Home Minister : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. आता राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे-पाटील यांचाही कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती वळसे-पाटील यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.

ट्विटमध्ये दिलीप वळसे-पाटील (Home Minister) यांनी म्हंटलं होतं की, “कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत,” अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली.

त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे,” असंही त्यांनी आवाहन केले आहे.

गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुखांनी सचिन वाझे प्रकरणात राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले. दिलीप वळसे-पाटील यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Back to top button