

पुढारी ऑनलाईन डेस्क : भ्रष्टाचाऱ्यांना भाजप पाठीशी घालत आहे. यावरुन भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. काँग्रेसची आज (दि. ६) पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (Maharashtra Politics)
काँग्रेसबाबत भाजपने चुकीचं वातावरण पसरवलेलं आहे. काँग्रेस (congress) मविआला सोबत घेवून लढणार आहे, असं पटोलेंनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री मोदींनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. भाजपला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. भ्रष्टाचाऱ्यांना भाजप पाठीशी घालत आहे. यावरुन भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा पटोलेंनी दिला आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर बोलत असताना ते म्हणाले की, वडीलधाऱ्या पवारांबाबत चुकीचे बोलणे आयोग्य आहे. प्रफुल्ल पटेलांची मानसिकता काय आहे हे जनतेने पाहिले आहे. पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का यावर बोलत ते म्हणाले की, पंकजा काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा