

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवरही उमटत आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या वेगवेगळ्या बेठका झाल्या. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांनी आता निवृत्त व्हावे, असा सल्ला दिला हाेता. या सल्ल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी उत्तर दिले आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी लालूप्रसाद यादव दिल्लीत आले हाेते. यावेळी माध्यमांशी बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले, अजित पवार सल्ला देतात म्हणून शरद पवार निवृत्त होतील का? म्हातारा कधी निवृत्त होतो का? राजकारणात निवृत्ती नसते." विरोधी एकजुटीवर बोलताना लालू प्रसाद म्हणाले की, "१७ पक्षांचे लोक एकत्र येत आहेत. भाजपला जे आराेप करायचे आहेत ते करु द्या. आगामी लाेकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे."
राहुल गांधींना लग्न करावे , असा सल्ला लालू प्रसाद यादव यांनी दिला हाेता. याबाबत विचारले असता लालू प्रसाद म्हणाले, "जो पंतप्रधान होतो तो पत्नीशिवाय नसावा. पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहणे चुकीचे आहे."