NCP Crisis News | प्रसंग बाका आहे पण...! आर. आर. आबांच्या रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका | पुढारी

NCP Crisis News | प्रसंग बाका आहे पण...! आर. आर. आबांच्या रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

पुढारी ऑनलाईन : अजित पवार भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आहेत याची उत्सुकता लागली आहे. शरद पवार यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहे. या बैठकीत दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी संबोधित केले. आबांच्या विचारांचा वारसदार म्हणून आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहण्याची भूमिका घेतली असल्याचे रोहित पाटील यांनी आज स्पष्ट केले. (NCP Crisis News)

”साहेबांना वचन देऊ इच्छितो की प्रसंगी महाराष्ट्र पिंजून काढू, कानाकोपऱ्यात जाऊ आणि येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष बवनू. सध्या बाका प्रसंग आहे. पण राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आणू” असे रोहित पाटील म्हणाले.
वाय. बी. चव्हाण सेंटरमधील बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या आहेत. या बैठकीत शरद पवार देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान, अजित पवार गटाची बैठक वांद्रे येथील एमईटीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला २८ आमदार उपस्थित राहिले असल्याचे समजते. येथील व्यासपीठावर नेतेमंडळी उपस्थित राहिली आहे. तर शरद पवारांच्या बैठकीत ९ आमदार सहभागी झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून आज शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. (NCP Crisis News)

 हे ही वाचा :

Back to top button