आमदार आहेत तर खुर्च्यांवर आमदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या चिकटवा?, भाजपचा शरद पवारांना टोला | पुढारी

आमदार आहेत तर खुर्च्यांवर आमदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या चिकटवा?, भाजपचा शरद पवारांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवार यांच्यासोबत नाहीत असे म्हणता तर वेगाने पत्रकार परिषदा घेणाऱ्यांचा मुंगीपेक्षा कमी वेग का झाला? तुमच्याकडे आमदार असतील तर खुर्च्यांवर नावाच्या चिठ्ठ्या चिकटवा किंवा आवश्यकता असेल तर शर्टवर चिठ्ठ्या चिकटवा आणि पत्रकार परिषद घ्या, असे आव्हान महाराष्ट्र भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदार संख्येच्या मुद्यावर बोलताना दिले आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत खेळीमेळीत चर्चा झाली. अतिशय आनंददायी वातावरणात बैठक पार पडली. शरद पवार गट आता पत्रकार परिषद का घेत नाही? तुमच्या सोबत आमदार आहेत तर नेहमी एका तासाच्या आत घाईने पत्रकार परिषदा घेता, आता का घेत नाही? खुर्च्यांवर किंवा आवश्यकता असेल तर शर्टवर चिठ्ठ्या चिकटवा आणि पत्रकार परिषद घ्या, असे आव्हान मुनगंटीवार यांनी दिले आहे.

“विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही. अजित पवार यांनी सत्य आणि धर्माची कास धरली आहे. प्रगती विरूद्ध अधोगती असा हा सामना आहे. भाजपमध्ये आले म्हणजे शुद्धीकरण होत नाही. अजित पवार यांच्याविरोधात तक्रारी तपासा एवढीच भूमिका होती, असे उत्तर सिंचन घोटाळ्याबाबत मुनगंटीवार यांनी दिले आहे. भाजप मुस्लिमांच्या विरोधात नाही. आमचा विरोध औरंगजेबाला आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button