Chandrashekhar Bawankule: ‘या’ घटनेचा आता तरी निषेध करणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल | पुढारी

Chandrashekhar Bawankule: 'या' घटनेचा आता तरी निषेध करणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुलढाण्यातील एका सभेदरम्यान असुदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणादरम्यान औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा भाजपने निषेध करत, हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता तरी निषेध करणार का? की बाटगी भूमिका घेणार?, असा सवाल महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. यासंदर्भातील ट्विट करत त्यांनी विरोधी पक्षाला कचाट्यात पकडले आहे.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, बुलढाण्यात असुदुद्दीन ओवैसींच्या भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. सरकारने या घटनेमागील सत्य तपासून कारवाई करावी आणि दोषींना धडा शिकवावा (Chandrashekhar Bawankule), अशी मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकवला होता, असे उदाहरण देखील बावनकुळे यांनी यावेळी दिले. तसेच छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंगजेबचा उदो उदो करणारी अवलाद पुन्हा डोकं वर काढत असून, सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

हेही वाचा:

 

Back to top button