पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून भारत देश जगात पाचव्या स्थानी : मंत्री प्रल्हास सिंह पटेल | पुढारी

पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून भारत देश जगात पाचव्या स्थानी : मंत्री प्रल्हास सिंह पटेल

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यापक विचार व संकल्पनेतून 9 वर्षांमध्ये भारत देश आर्थिकस्तरावर जगात पाचव्या स्थानी पोहचला. केंद्रासह राज्यात भरीव कार्यामुळे गेल्या 9 वर्षांपासून महिला भगिणी सुखी- समाधानी असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या सत्तेतील कामांसह योजनांचा लेखाजोखा मांडण्यासाठी मंत्री, खासदार, आमदार व नेते देशभर सेवा समर्पण करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रियाराज्य मंत्री प्रल्हाससिंह पटेल यांनी केले.

शहरात नगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिर्डी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत महिला मेळावा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मंत्री प्रल्हादसिंह पटेल बोलत होते. यावेळी चांदवडचे आ. राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन मंत्री नितीन दिनकर, जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, सरचिटणीस वंदना गोंदकर, तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, वैशाली चव्हाण, पुष्पा हरदास, अनिता शर्मा, युवा तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, शहराध्यक्ष रुपेश हरकल, गिरीधर आसणे, अजित बाबेल, रवी पंडित, विठ्ठल राऊत, मिलिंदकुमार साळवे, योगीराज परदेशी, किरण रोकडे आदी उपस्थित होते. स्वागत महिला तालुकाध्यक्षा मंजुश्री ढोकचौळे यांनी केले.

मंत्री प्रल्हादसिंह पटेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता कार्यकाळात साडेतीन कोटी घरकुलांचा लाभ देण्यात आला. पैकी 2 कोटी घरे महिलांच्या नावावर आहेत. 9.60 लाख महिलांना उज्ज्वला गॅसचा लाभ मिळाला. 9.72 लाख शौचालये तर 12 कोटी कुटुंबांना जल योजनेंतर्गत घरपोहोच नळ पाण्याचा लाभ दिला. यामुळे घरोघरी महिला सुखी-समाधानी आनंदी असल्याचे सांगत, या सुविधा देताना, कुठलाही जात-पात, धर्म, पंथ पाहिला नाही, भेदभाव केला नाही, परंतु विरोध मात्र भाजपावर केवळ नाहक आरोप करतात. त्यात तथ्य नसल्याचे मंत्री पटेल यांनी ठणकावून सांगितले.

जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला जागतिक स्तरावर पाचव्या स्थानावर आणले. योजना सक्षमपणे राबवून महिलांना सुखी-समाधानी केले. राज्यात बजेटमध्ये महिलांना स्वतंत्र मोठी तरतूद केली. लेक लाडकी योजनेतून मुलगी जन्मतःच 5 हजार रुपये, मातृत्व वंदना, विधवा पेन्शन, महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींना वसतिगृहात सुविधा आदी योजनांचा उहापोह केला. सूत्रसंचलन सांस्कृतिकचे जिल्हाध्यक्ष बंडूकुमार शिंदे तर आभार महिला मोर्चा शहराध्यक्षा पूजा चव्हाण यांनी मानले.

महिलांना सुरक्षितता दिल्याचे सांगताच टाळ्या!

वीज, पाणी, गॅस आदी सुविधा देतानाच तब्बल 80 कोटी गरजुंना अन्नधान्य देण्याचे मोठे काम केंद्राने केले. एवढ्यावरचं न थांबता महिलांना सुरक्षितता प्रदान केल्याचे केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हास सिंह पटेल यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

हेही वाचा

पुणे : शिक्षक भरतीमध्ये दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी करा ; विद्यापीठाचे निर्देश

नाशिक : अपूर्व हिरेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर

Ashadi Vari : आषाढीसाठी आजपासून धावणार लालपरी

Back to top button