CM Eknath Shinde: दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करू नये; मुख्यमंत्री शिंदेचा ठाकरेंवर घणाघात | पुढारी

CM Eknath Shinde: दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करू नये; मुख्यमंत्री शिंदेचा ठाकरेंवर घणाघात

पुढारी ऑनलाईन: मुंबई मनपा भ्रष्टाचाराची चौकशी होणार असून, यासाठी कॅगकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटी चौकशी होणार असल्याने, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणे योग्य नाही; असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या तिजोरीतच राहिला पाहिजे. तो कोणालाही पळवता येणार नाही. कोणताही राजकीय हेतू न ठेवता मुंबई मनपा भ्रष्टाचाराची एसआयटीकडून निप:क्षपणे चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून दुध का दुध आणि पाणी पाणी का पाणी होईल, असे ते म्हणाले. जे सत्य आहे ते जनते समोर यायला पाहिजे हीच सरकारची भूमिका (CM Eknath Shinde) आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आधीच्या सरकारने थांबवलेले प्रकल्प गेल्या वर्षभरात आमच्या सरकारने पुन्हा सुरू केले. अडवलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले आहेत. G20 चे अध्यक्षपद हे भारताला मिळणे हे गौरवास्पद आहे. त्यामुळे भारताचे नाव जगभरात जातय असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button