शिवसेना मुंबई महापालिकेवर ‘विराट मोर्चा’ काढणार; उद्धव ठाकरेंचा एल्गार

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महापालिका विसर्जित झाल्यानंतर निवडणुका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. काही ना काही कारणानं महापालिकेची उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी १ जुलैला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) विराट मोर्चा काढणार आहे, असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आज मुंबई येथे माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्याच सरकार बेकायदेशीर आहे, सरकारला जाब विचारणार कोणीच नाही. महापालिका निवडणुका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. हे बेकायदेशीर सरकार निवडणुका घेत नाही. लोकांची काम करायची कशी, जनतेचा पैसा उधळला जात आहे. त्यांना विचारणार कोणीच नाही. मुंबईला मायबापच राहीले नाही. सगळं काही लुटालूट सुरू आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी १ जुलैला शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे याचं नेतृत्व करतील. कोणत्याही कामासाठी महापालिकेचा पैसा बेधडक वापरला जातो. हा जनतेचा पैसा आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news