Stock Market Closing | सेन्सेक्स २१६ अंकांनी घसरला, ‘या’ बँकिंग शेअर्समध्ये जोरदार विक्री | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्स २१६ अंकांनी घसरला, 'या' बँकिंग शेअर्समध्ये जोरदार विक्री

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात आज सोमवारी चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज सर्वकालीन उच्चांकाजवळ जात तेजीत सुरुवात केली होती. पण हे तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांनी खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स २१६ अंकांनी घसरून ६३,१६८ वर बंद झाला. तर निफ्टी ७० अंकांच्या घसरणीसह १८,७५५ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

आजच्या व्यवहारात खासगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. आज सेन्सेक्सने ६३,४७४ वर सुरुवात केली होती. त्यानंतर तो ६३,५७४ अंकांपर्यंत वाढला. त्यानंतर तो ६३,१०० वर स्थिरावला.

‘हे’ होते टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टीसीएस, सन फार्मा, टायटन, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयटीसी हे शेअर्स वाढले. तर कोटक बँक, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, आयसीआयसीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एचसीएल टेक, रिलायन्स हे शेअर्स घसरले होते.

अदानी एंटरप्रायजेसला फटका

अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आज ४ टक्क्यांनी घसरून २,४०१ रुपयांवर आला. काल हा शेअर २,४८५ रुपयांवर बंद झाला होता. अदानी समुहाच्या १० पैकी ७ शेअर्सनी आज लाल चिन्हात व्यवहार केला. एनडीटीव्हीचा शेअरही सुमारे १ टक्क्यांहून अधिक घसरून २३५ रुपयांवर आला.

खासगी बँकांचे शेअर्स गडगडले

बँकिंग स्टॉक्समध्ये आज खासगी बँकांचे शेअर्स टॉप लूजर होते. यात करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बंधन बँक यांचा समावेश होता.

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम

एनएसईच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ७९५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६८१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. गेल्या ४ सत्रांत परदेशी गुंतवणूकदारांनी ७,२७२ कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे बाजारात तेजी कायम राहिली आहे. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

Back to top button