मुंबई: शिवसेनेचे पहिले परळ शाखाप्रमुख विजय गावकर यांचे निधन | पुढारी

मुंबई: शिवसेनेचे पहिले परळ शाखाप्रमुख विजय गावकर यांचे निधन

मुंबई, पुढारी वृत्तसेवा:  शिवसेनेचे पहिले परळ शाखाप्रमुख व माजी नगरसेवक विजय गावकर यांचे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिवंगत बाळासाहेबांचे नातू राहुल जयदेव ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक शाम देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम, स्थानिय लोकाधिकार समितीचे उल्हास बिले, प्रकाश वराडकर यांनी गावकर यांना श्रध्दांजली वाहिली.

गावकर यांच्यासारख्या कडव्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांना जी प्रामाणिक साथ दिली. त्यामुळे शिवसेनेची संघटना जनसामान्यांच्या मनामनात रुजलेली आहे. त्यामुळे राजकारणाचे काहीही होवो, पण गावकरांसारख्या असंख्य शिवसैनिकांच्या त्यागाने उभी राहिलेली शिवसेनेची संघटना भक्कम राहिल, असे राहुल ठाकरे म्हणाले. शाम देशमुख आणि कुमार कदम यांनी गावकर यांनी शिवसेनेच्या प्रारंभाच्या काळात घेतलेल्या मेहनतीची माहिती सांगितली.

यावेळी परळ, शिवडी, लालबाग भागातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. कबड्डीपटू जया शेट्टी, चंद्रकांत भारती, आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार दगडू सकपाळ, बाबुराव खोपडे यांनी गावकर यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा 

Back to top button