Supriya Sule news : आम्हीही शोधत आहोत ‘हितचिंतक’, सुप्रिया सुळेंचा जाहिरातीवरुन चिमटा | पुढारी

Supriya Sule news : आम्हीही शोधत आहोत 'हितचिंतक', सुप्रिया सुळेंचा जाहिरातीवरुन चिमटा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “राज्यात सत्ताधारी फक्त आपापसातील वादात व्यस्त आहेत. जर असंच सुरु राहिलं तर राज्य चालणार कसे” असा सवाल करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच पत्रकार परिषेत बोलत होत्या. वाचा सविस्तर माहिती. (Supriya Sule news)

Supriya Sule news : राष्ट्रवादीचे कार्याध्यक्षा शोधत आहेत हितचिंतक

‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ अशी हाक देत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.१३) एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये त्यांनी आकडेवारी देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे. यामुळे या जाहिरातीने राज्य भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटले. यासंबंधी बोलत असताना  शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी, असं वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. यावरुन बोलत असताना त्यांनी चिमटा घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या मी व दादाही हितचिंतक शोधत आहोत. (Supriya Sule)

सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल असंवेदनशील

सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या की, राज्यात महिलांच्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. महिला सुरक्षेची जबाबदारी संपूर्ण गृहखात्याची आहे. मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. हे सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल असंवेदनशील आहे. पुढे बोलत असताना त्य़ा म्हणाल्या सत्ताधारी फक्त आपापसातील वादात व्यस्त आहेत. असंच सुरु झालं तर राज्य कसं चालणार सेनेचा जाहिरात वाद दुर्देवी आहे.
सुप्रिया सुळे या नुकत्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा झाल्या आहेत. यावरुन त्या बोलत असताना त्या म्हणाल्या की, प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील काम म्हणजे टीमवर्क आहे. प्रत्येकाचं काम हे कुटुंबाचं काम म्हणून केलं जात आहे.  बोलत असताना त्या म्हणाल्या की होय आम्ही लोकसभेची तयारी सुरु केली आहे. सभा-मिटींग होत आहेत. आमच्यासह महाविकास आघाडीच्याही मिटींग होत आहे.
हेही वाचा

Back to top button