Stock Market Updates | बाजारात खरेदीचा जोर! सेन्सेक्स ६३,२०० पार, ‘हे’ शेअर्स तेजीत | पुढारी

Stock Market Updates | बाजारात खरेदीचा जोर! सेन्सेक्स ६३,२०० पार, 'हे' शेअर्स तेजीत

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) शुक्रवारी तेजीत सुरुवात केली. बाजारातील बँकिंग, वित्तीय आणि ऑटो स्टॉक्स आघाडीवर होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने सुमारे ३०० अंकांनी वाढून ६३, २२० वर व्यवहार केला. तर निफ्टी १८,७७० वर होता. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ विलंबाने करेल असे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदार सुखावले आहेत. यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे. (Stock Market Updates)

‘हे’ शेअर्स वधारले

सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स, एसबीआय, टायटन, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वधारले. तर टीसीएस, विप्रो, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. (Stock Market Updates)

अमेरिका, आशियाई बाजारात तेजीचे वारे

फेडरल रिझव्‍‌र्ह व्याजदर वाढीला ब्रेक देईल या संकेताने अमेरिकेतील शेअर बाजार गुरुवारी वधारले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) १.३ टक्के वाढला. तर एस अँड पी (S&P 500) ५०० निर्देशांक १.२ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite Index) १.२ टक्के वाढला होता. दरम्यान, आशियाई बाजारातील शेअर्स शुक्रवारी चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. चीनचा निर्देशांक CSI 300 निर्देशांक ०.३ टक्के वाढला आहे. तर हाँगकाँगचा हँगसेंग (Hang Seng) निर्देशांक ०.४ टक्के वाढला. पण जपानचा निक्केई (Japan’s Nikkei) घसरला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ कायम

NSE डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी ३,०८६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (domestic investors) २९८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

हे ही वाचा :

Back to top button