

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : जुहू कोळीवाडा येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी उतरलेले सहा जण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले. यातील दोघांना स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र चार जण गायब असून नौदल व अग्रिशमन दलामार्फत शोध घेण्यात येत आहे. (Mumbai News)
जुहू कोळीवाडा येथे बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. दरम्यान बुडालेली मुले वाकोला, सांताक्रुझ येथील आहेत.
बुडालेल्या मुलांची नावे
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. तरीही सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १२ ते १५ वयोगटातील मुले जुहू कोळीवाडा येथे समुद्रात उतरली. ही मुले समुद्रात अर्धा किलोमीटर दूरवर पोहोचली. दरम्यान समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही मुले समुद्रात बुडाली. यातील दोघांना स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दलासह नौदलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री ११ वाजता ती थांबवण्यात आली. समुद्रात भरती-ओहोटीमुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलीस, अग्रिशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा