मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात.
एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) ग्रुपसाठी होणारी सीईटी ९ ते १३ मे कालावधीत पार पडली. ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २५ हजार ६४५ विद्यार्थी गैरहजर होते. तर पीसीबी (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र) ग्रुपची सीईटी १५ ते २० मे या कालावधीत पार पडली. या परीक्षेला ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १९ हजार ३०९ विद्यार्थी गैरहजर होते. आज निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली आहे.
इथे पाहाल निकाल : www.mahacet.org and www.mahacet.in
हेही वाचा :