“अशा प्रवृत्तींना सत्ताधारीच प्रोत्साहन देतात”; कोल्हापूर, संगमनेर प्रकरणावरून शरद पवारांचा गंभीर आरोप | पुढारी

"अशा प्रवृत्तींना सत्ताधारीच प्रोत्साहन देतात"; कोल्हापूर, संगमनेर प्रकरणावरून शरद पवारांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर आणि संगमनेर येथे घडलेल्या घटना हे कोणा एकट्या दुकट्याचं काम नाही. त्याच्या मागे एक विचारधारा आहे. त्यामुळेच अशा घटना घडवल्या जातात. सत्ताधारी पक्षच अशा गोष्टींना प्रोत्याहित करतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूरला मोबाईलवर कुणीतरी चुकीचा मेसेज पाठवला असेल, पण यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्याहित करतो. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची राजकर्त्यांची जबाबदारी आहे. पण राजाकारणी किवा त्यांच्याशी संलग्न लोक रस्त्यावर उतरू लागले. जाती-जातींमध्ये अहिंसतेतून कटूता निर्माण व्हायला लागली तर हे काय बरोबर नाही. जे घडत आहे ते एकट्या दुकट्याचे काम नाही, त्याच्या मागे विचारधारा आहे. अशा घटना कुठे ना कुठे घडत आहेत. त्यामुळे लहान घटकांना संरक्षण देणे आणि कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याविरोधात कारवाई करणे हे सरकारच काम आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांनी सामंजस्याने जागा लढवल्या पाहिजेत

लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाही असे भाकीत शरद पवार यांनी केले आहे. तेलंगणाचे मॉडेल मी तपासतो आहे. माझ्या सहकाऱ्यांना वाटते लोकसभा विधान सभा एकसोबत होतील. मात्र मला वाटतं नाही. कारण राज्यातील सरकार लोकसभेवर लक्ष केंद्रित करतील असे वाटते. आपण एकमेकांच्या पायात पाय घालून सत्ताधाऱ्यांना बळ मिळते, विरोधी पक्षांनी सामंजस्याने जागा लढवल्या पाहिजेत. एक विशिष्ट विचारधारा राज्यपाल भवनात आहे, मागचे राज्यपाल बोलके होते, आत्ताचे कसे आहेत माहित नाही. आकडा वाढवा म्हणून जागा मागितल्या नाही पाहिजेत. ज्यांची निवडणून येण्याची पात्रता आहे त्यांना उमेदवारी द्यावी, अशी भुमिका राष्ट्रवादीची आहे. सध्या राज्यांच्या निवडणुकीचा ट्रेंड भाजपच्या विरोधात आहे. राज्यांच्या निवडणुकीत जनतेने बदल करण्याचं ठरवलेल‌ं दिसत. एकत्र येऊन आपण पर्याय देण्याची आवश्यकता आहे.

पक्ष सोडलेल्यांची फार चिंता नाही

तेलंगणाची मी माहिती घेतोय, महाराष्ट्राची आणि तेलंगणाची परिस्थिती वेगळी आहे असा निर्णय घेण एका दिवसात शक्य होत नाही. कोण बीआरएस’मध्ये जात आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. जे‌ जात आहेत त्या़ची काही चिंता करायची गरज नाही. तेलंगणाची योजना समजून घेऊन त्याचा विचार करायला हवा. यामुळे आत्महत्या कमी झाल्यात का याची एक माहिती घ्यावी लागेल. जे पक्ष सोडून जात आहेत त्यासाठी फार चिंता करण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया पवार यांनी भगीरथ भालकेंच्या बीआरएस प्रवेशावर दिली.

विकासकामांमध्ये नितीन गडकरी राजकारण करत नाहीत, असे म्हणत पवार यांनी पुन्हा एकदा गडकरी यांचे कौतुक केले.  दिल्लीती कुस्तीपटूंच्या आंदोलनावरही पवार यांनी भाष्य केले आहे. सरकारने कुस्तीपटूंची मागणी मान्य करावी. बृजभूषण सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे ते या प्रकरणात कीती खोलात जातात याकडे सगळयांचे लक्ष आहे. सरकार म्हणत आहे की आधी चौकशी करतो आणि नंतर याचा विचार करतो. पण निदान चौकशी सुरू झाली ही माहिती तरी येणे समाधानाची गोष्ट ठरेल, असे पवार यांनी म्हटले आहे.

…अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले

राज्य सरकारने पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करावी. जनतेच्या गरजा समजून घ्यायला हव्या. तेलंगणाची योजना समजून घ्यावी लागेल. जादा गुंतवणूक धरण, रस्ते, वीज, आरोग्य यावर केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. ५० ट्क्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती महाराष्ट्रात गंभीर आहे. याबाबत राज्य आणि केंद्राने निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय शेतकऱ्यांना तरी घ्यावा लागेल. आणि त्याला राष्ट्रवादीचा पाठींबा असेल, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button