नवीन महाराष्ट्र सदनातील आणखी एक घोटाळा बाहेर काढणार : किरीट सोमय्या | पुढारी

नवीन महाराष्ट्र सदनातील आणखी एक घोटाळा बाहेर काढणार : किरीट सोमय्या

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी केला. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर त्यामागील सूत्रधार समोर येतील. परंतु, अद्याप यावर थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, असे प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना सोमय्या यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ज्या घोटाळ्यात राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले होते, हा घोटाळा आपण अगोदर बाहेर काढला होता याची देखील आठवण सोमय्या यांनी यावेळी करून दिली.

‘लव जिहाद’संदर्भात देखील सोमय्या यांनी यावेळी भाष्य केले. नगर जिल्ह्यात अशा प्रकारची 6 प्रकरणे समोर आली आहेत. यासंदर्भात काही पालकांसोबत चर्चा केली. बुधवारी (दि. 7) नगर जिल्ह्यातील पीडितांची भेट घेणार आहे. लव जिहादची प्रकरणे वाढत आहेत. यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे देखील सोमय्या म्हणाले. 16-17 वर्षांपासून मुलींना ट्रॅप करीत त्यानंतर त्यांच्यासोबत लग्न केले जाते, असा दावा देखील सोमय्या यांनी केला.

आणखी वाचा :

 

Back to top button